कै. नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानतर्फे दिवंगत पत्रकार नामदेवराव नालंदे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि. ५) शहरातील ज्येष्ठ नागरिक संघात पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच दीपक वाबळे, माधव जोशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात 'कै. नामदेवराव नालंदे जीवनगौरव पुरस्कार' हा मानाचा पुरस्कार मरणोत्तर कै. द.रा. पवार यांना तसेच पळशी येथील पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे योगेश नालंदे यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक आणि पत्रकारहिताच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी बिरादार म्हणाले की डिजिटल युगात पत्रकारांनी सतत स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे. समाजातील अनेक संवेदनशील घटनांवर प्रकाश टाकण्याचे कार्य पत्रकार बांधव करत असून, त्यांच्या सतर्कतेमुळेच अनेक वास्तव बातम्या समाजासमोर येतात. खरी पत्रकारिता लोकशाही अधिक बळकट करते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नानासाहेब साळवे, प्रशांत नालंदे, मेघराज नालंदे, किरण हिवरे, प्रदीप ढुके आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. चंदूकाका सराफ यांच्या वतीने ट्रॉफीचे सौजन्य देण्यात आले.
©2026. All Rights Reserved.