ताज्या बातम्या
डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. ||

इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत

जागतिक हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव, १० आदर्श हिंदी शिक्षकांना पुरस्कार

जागतिक हिंदी दिनाचे औचित्य साधून इंदापूर हिंदी अध्यापक संघाच्या वतीने शनिवारी (दि. १० जानेवारी) निमगाव केतकी येथे भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या हिंदी निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उपक्रमशील व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी इंदापूर हिंदी अध्यापक संघाच्या कार्याचे विशेष कौतुक करत, “संघाने केलेले कार्य केवळ इंदापूरपुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार काढले.

हिंदी निबंध स्पर्धेत प्रत्येक शाळेतून तीन गटांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या एकूण नऊ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचा फुल, श्रीफल, शाल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी १० आदर्श हिंदी शिक्षक व ४५ उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय पाच निवृत्त शिक्षकांचा सेवापूर्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व नवी दिल्ली येथील अनुदान समितीचे सदस्य कैलास जाधव यांनी हिंदी भाषेचे वर्तमानातील महत्त्व, व्यवहारातील उपयोग व प्रचार-प्रसाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच इंदापूर हिंदी अध्यापक संघाच्या कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरव व्यक्त केला. संघाचे अध्यक्ष के. डी. भोंग यांनी प्रास्ताविकात संघाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे. एन. पाटील सर, सचिव सी. टी. कोकाटे सर, शिरसाट सर, माने सर, छत्रपती शिवाजी हायस्कूल भवानीनगरचे रमेश मचाले सर, उस्मान मुलाणी सर, सुधाकर भोंग सर, राजेंद्र रणमोडे सर, उपाध्यक्ष डी. जे. निंबाळकर सर, कार्याध्यक्ष डी. व्ही. वाघ सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मनीषा भोसले यांनी अल्पोपहार दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गाडे यांनी केले. त्यांना शब्बीर मुलाणी, मिनानाथ कोटे सर, संजीव पांढरे सर व शहंशाह मुजावर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार राजेंद्र रणमोडे यांनी मानले.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.