ताज्या बातम्या
बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. || तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले 'कमळ' ; सरपंचपदी प्राजक्ता वाघ यांची निवड. || २o२५ च्या महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने ज्योती अमोल तुपे सन्मानित. || विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत' अभियान उत्साहात. || इंदापूर पंचायत समिती आरक्षण जाहीर ; कोणता गण कोणासाठी राखीव?. || इंदापूर वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार. || खरी पत्रकारिता लोकशाही बळकट करते : अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार. || पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : प्रविण माने. || निरा-भिमा कारखाना प्रतिटन १०० रुपये देणार ; शेतकऱ्यांची दिवाळी 'गोड' होणार. || करदात्यांना दिलासा ; Tax Audit Report सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. || भगरीच्या पिठामुळे आठ जणांना विषबाधा ; बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील घटना. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला उद्योगभेट ; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम. || बारामतीत चारचाकीची काच फोडून तीन लाखांची रोकड लंपास. || चेक बाऊन्सप्रकरणी चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ; बारामती न्यायालयाचा निकाल. || नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातलं अन शेतातलं सगळं काही हरवून बसलेल्या बळीराजाला आपल्या लेखातून 'तुला जगलंच पाहिजे' म्हणत धीर देताहेत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी. || विद्या प्रतिष्ठानच्या ‘पाटी’ला क्वालालंपूरमध्ये सुवर्णपदक. || सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी सरसावले. || 'जल्लोष २०२५' युवक महोत्सवात विद्या प्रतिष्ठान ठरले सर्वोत्कृष्ट. || ४ ऑक्टोबरपासून ‘सेम डे चेक क्लिअरिंग’ सेवा सुरू ; ग्राहकांना वेगवान व्यवहाराची हमी. || विद्यार्थ्यांच्या कल्पक संशोधनाला वाव ; ‘आविष्कार’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद. || विद्या प्रतिष्ठानच्या मुलींची कबड्डीत विजयी खेळी. || इंदापूर तालुक्यातील गावागावांत 'मोदी विकास मॅरेथॉन' राबवणार : प्रविण माने. || टेक्सटाईल पार्कमधील महिला कामगारांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेवर जनजागृती. || महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ ठरले सर्वोत्कृष्ट. ||

घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पिंपळी ग्रामपंचायतीची ठोस कामगिरी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण व करसंकलन वाढवण्यासाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पिंपळी ग्रामपंचायतीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रभावी प्रयत्न करण्यात आले. या अभियानात माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अश्विनी सुनिल बनसोडे यांनी स्वतः पुढाकार घेत आदर्श निर्माण केला आहे.

या अभियानांतर्गत मागील थकीत घरपट्टी व पाणीपट्टीवर ५० टक्के सवलत देऊन चालू वर्षाची संपूर्ण रक्कम भरण्याची सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. वसूल होणाऱ्या करातून गावातील रस्ते, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज व इतर मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

पिंपळी गावात अनेक वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टी थकीत असल्याने अनेक ग्रामस्थ विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत होते. परिणामी ग्रामविकासाचा आर्थिक वेगही मंदावला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभा, जाहिरात फलक, दवंडी आदी उपाययोजना करण्यात आल्या. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने माजी उपसरपंच अश्विनी बनसोडे यांनी पुढाकार घेत विशेष ग्रामसभेत आपल्या आजेसासू कौशल्या भगवान बनसोडे यांच्या नावावरील मागील थकीत व चालू वर्षाची संपूर्ण कररक्कम स्वतः भरून अभियानाची आदर्शवत सुरुवात करून दिली.

यावेळी सरपंच स्वाती अशोकराव ढवाण, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, छत्रपती कारखान्याचे संचालक संतोषराव ढवाण, उपसरपंच अजित थोरात, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी अश्विनी बनसोडे यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

अश्विनी बनसोडे यांनी गावातील महिला, बचत गटातील महिलांमध्ये जनजागृती करून या करसवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विशेष ग्रामसभेपासून ३१ डिसेंबरपर्यंत अनेक नागरिकांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेत कर भरला असून, या अभियानातून लाखो रुपयांची थकीत वसुली करण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे.

या यशस्वी अभियानासाठी सरपंच स्वाती ढवाण, माजी उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे, उपसरपंच अजित थोरात, माजी सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, सदस्या मीनाक्षी अशोकराव देवकाते, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका व सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा कालावधी ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र ५० टक्के करसवलतीबाबत पुढील निर्देश अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.