ताज्या बातम्या
डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. ||

“राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?

प्रदीप गारटकरांच्या पक्ष प्रवेश झाला आता मानेंचा रोख कुणाकडे?

“राणाजी, यकीन करो हमारा,

हम किसीं को धोखा नही देते

मगर धोखा देनेवाले को दुबारा मौका भी नही देते…”

हा भारदस्त डायलॉग सध्या इंदापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. इंदापूरचे भाजप नेते प्रविण माने यांनी हा संवाद असलेला व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्यानंतर, तो नेमका कोणाला उद्देशून आहे? याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, हे स्टेटस कणखर भूमिका, थेट इशारा आणि ‘एकदाच संधी’चा संदेश देणारा हा संवाद राजकीय संदर्भात वापरला गेल्याने त्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

नुकत्याच झालेल्या इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रविण माने यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतीने कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक आघाडी स्थापन केली होती. या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते प्रदीप गारटकर. मात्र, अत्यंत चुरशीच्या लढतीत गारटकर यांचा केवळ १२७ मतांनी पराभव झाला.

या पराभवानंतर अवघ्या काही दिवसांतच, प्रदीप गारटकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली. याच पार्श्वभूमीवर प्रविण माने यांनी ठेवलेला हा स्टेटस अनेक अर्थांनी पाहिला जात आहे.

● जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुका आणि वाढते राजकीय तणाव ●

दरम्यान, पुणे जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशा परिस्थितीत, इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच संभाव्य बदलत्या राजकीय गणितांच्या पार्श्वभूमीवर प्रविण माने यांनी स्टेटस वरून दिलेला हा इशारा नेमका कुणासाठी आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

● स्टेटस, संकेत आणि आगामी लढती ●

सध्या तरी प्रविण माने यांनी या स्टेटसबाबत कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी राजकारणात शब्दांपेक्षा संकेत अधिक बोलके असतात, हे इंदापूरकरांना नव्याने सांगण्याची गरज नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा स्टेटस फक्त डायलॉग की राजकीय इशारा हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होणार आहे.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.