बारामती येथील शरद पार्क गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत नितेश जितेंद्र धुमाळ यांची अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संस्थेच्या सर्व सभासदांनी धुमाळ यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले. यावेळी सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नितेश धुमाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही जबाबदारी केवळ माझी नसून संपूर्ण समितीची आहे. अनुभवी आणि उत्साही सदस्यांच्या सहकार्याने संस्थेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत सोसायटीतील सर्व सुविधा आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन.”
निवडीनंतर सभासदांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच, आगामी काळात एकोप्याने काम करत संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार नव्या समितीने व्यक्त केला. या कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी, संस्थेचे सर्व सभासद तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.