पिंपळी गावातील ग्रामदैवत असलेल्या मारुती मंदिरात आरती, भजन व धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या ध्वनीक्षेपक साहित्याची गरज ओळखून युवानेते युगेंद्र पवार यांनी मंदिराला ध्वनीक्षेपक यंत्रणा भेट देत भाविकांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद दिला आहे.
पिंपळी गावातील ग्रामस्थ, भाविक भक्त आणि भजन मंडळाच्या वतीने मंदिरात आरती व भजनासाठी साउंड सिस्टमची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत युवानेते युगेंद्र पवार यांनी लाऊड स्पीकर, मशीन, माईक व वायरिंगसह सुमारे ५० हजार रुपयांचा ध्वनीक्षेपक साहित्य संच तात्काळ उपलब्ध करून दिला.
या साहित्यामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सेवाभावी भूमिकेतून केलेल्या या मदतीबद्दल ग्रामस्थांनी युगेंद्र पवार यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी आकाश बनकर, हनुमंत देवकाते, नाना देवकाते, नारायण माने, ज्ञानदेव यादव, चेतन खोमणे, भानुदास बाबर, लखन कचरे, अक्षय बाबर, अभिजित बाबर, जनार्धन बोराटे यांच्यासह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.