ताज्या बातम्या
डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. ||

एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश

२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे तब्बल २० गुन्हे उघड

पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. एकाच रात्री दौंड पोलीस ठाणे हद्दीसह इतर ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या टोळीतील आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे २५ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दौंड, बारामती व जुन्नर विभागात जबरी चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नागरिकांना मारहाण करून, शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली होती.

दौंड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासात आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातून येऊन पुणे ग्रामीण भागात गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले.

एकाच रात्री चार ठिकाणी दरोडे

दि. 10 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास दौंड पोलीस ठाणे हद्दीतील बाबीरनगर, आवडेवस्ती, आवाळेवस्ती व खोरवडी या चार ठिकाणी सात दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत नागरिकांना मारहाण केली. यावेळी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकल असा सुमारे 7 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता.

तपासादरम्यान गणेश मंगेश काळे (रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), विशाल हंबरड्या काळे (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड), किशोर रावण भोसले (रा. बाबुळगाव, ता. कर्जत) यांना ताब्यात घेण्यात आले असून एका विधीसंघर्षित बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे.

२० गंभीर गुन्ह्यांची उकल

अटक केलेल्या आरोपींकडून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दौंड, बारामती, माळेगाव, जेजुरी, जुन्नर, आळेफाटा, यवत आदी पोलीस ठाण्यांमधील दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये ४ दरोडे, ६ जबरी चोरी आणि ५ घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

तसेच आरोपींकडून अहमदनगर जिल्ह्यातील दरोड्याचे ३, जबरी चोरीचे ३ आणि घरफोडीचे २ असे आणखी ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांच्या कारवाईत आरोपींकडून सुमारे १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा बाजारभावाप्रमाणे सुमारे २५ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, दौंड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंडचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, माळेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अभिजीत सावंत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार, शिवाजी निकम, असिफ शेख, सचिन घाडगे, किशोर तेलंग, योगेश नागरगोजे, राजू मोमीण, गणेश धनवे, संतोष भापकर, सुभाष राउत, गुरूनाथ गायकवाड, विकास कापरे, सुलतान डांगे, रईस मुलाणी, तुषार चव्हाण, गणेश डेरे, धिरज जाधव, तुषार भोईटे, स्वप्निल अहीवळे, अजय घुले, गणेश होळकर, गुलाब पाटील, शैलेश स्वामी, राहुल पवार, समाधान नाईकनवरे, पोलीस हवालदार सुजाता कदम, भाउसाहेब पुंड, अजय देडे, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस अंमलदार नितीन बोराडे, धनंजय गाढवे, पवन माने, गोरख हजारे, सागर म्हेत्रे, रमेश चितारे, संतोष भोसले, सचिन साप्ते, ओमराज कुमकुटे, महेंद्र लोहार, सोमनाथ चौंडे, किरण पांढरे, संजय कोठावळे, महिला पोलीस अंमलदार वैशाली बनसोडे, काजल शिंदे, ऊरूळी कांचनचे सचिन जगताप, प्रविण चौधर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.