ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान, कला व गणित प्रदर्शन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणाऱ्या या प्रदर्शनात विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात आले असून उपस्थितांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमासाठी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या संचालिका पूजा देवळे, ओंकार देवळे, नेहा देवळे, योजना देवळे तसेच प्राचार्या वृषाली जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात बारामतीच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
‘समृद्ध बारामती आमचा अभिमान’ या संकल्पनेवर आधारित इयत्ता सहावीतील विद्यार्थी प्रथमेश जगताप याने सादर केलेल्या प्रतिकृतीने विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एआय (AI) आधारित प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, साऊंड सिस्टिम, रोबोटिक्स आदी विषयांवरील विविध मॉडेल्स सादर केली.
विद्यार्थ्यांनी प्रयोगांचे प्रात्यक्षिक देत त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे स्पष्ट केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलता वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे तसेच शिक्षकांच्या परिश्रमांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड अधिक वाढते, असे मत व्यक्त केले.
©2026. All Rights Reserved.