ताज्या बातम्या
डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. ||

बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान

पुणे जिल्हा बँक आणि नाबार्ड ने घेतला पुढाकार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुका व शहरात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत असून या अभियानातून शेतकरी, महिला बचत गट, युवा उद्योजक व विद्यार्थ्यांना विविध कर्ज व शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बारामती मुख्य शाखेच्या अंतर्गत मुख्य शाखा अधिकारी संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व शहरातील विविध उपशाखांमार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महिला बचत गटांसाठी सामूहिक व वैयक्तिक कर्ज योजना, कर्जावरील ४ टक्के व्याज परतावा, शेतकऱ्यांसाठी झिरो टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज, अल्प व दीर्घ मुदतीची कर्जे तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन, गायी पालन व मत्स्यपालन यांसारख्या शेतीपूरक व्यवसाय कर्ज योजनांची माहिती देण्यात आली.

याशिवाय आयटीआय, डिग्री, डिप्लोमा, आयटी इंजिनिअर व प्रशिक्षित युवकांसाठी उद्योजक कर्ज योजना, विविध महामंडळांच्या कर्ज व अनुदान योजना, संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी २०० रुपयांत बचत खाते, महिला बचत गटांसाठी ५०० रुपयांत बचत खाते, इंटरनेट बँकिंग, बँक अ‍ॅप, फोन पे, गुगल पे, स्कॅनर सुविधा, एटीएम कार्ड, जीवनज्योती विमा व सुरक्षा विमा योजनांची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज योजना, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश अनुदान, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक तसेच राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन विद्या प्रतिष्ठान कॉलेज, बारामती एमआयडीसी तसेच पिंपळी जळोची, काटेवाडी, गुणवडी मार्केटयार्ड, खांडज, पारवडी, अंजनगाव–देऊळगाव रसाळ व डोर्लेवाडी येथे आर्थिक साक्षरता समन्वयक अश्विनी बनसोडे यांनी केले. यावेळी विमा फॉर्म भरून घेणे व बँक खाती उघडण्याची प्रक्रिया देखील पार पडली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील आघाडीची व कोट्यवधींची उलाढाल करणारी बँक ठरली असून सहकार क्षेत्रात बँकेचा सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनी केले. शेतकरी, महिला बचत गट, युवक व उद्योजकांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुख्य शाखा व्यवस्थापक संदीप जगताप यांनी शेती व बिगर शेती कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, कृषी पर्यटन कर्ज, सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप कर्ज, सोनेतारण कर्ज, वाहन कर्ज, औद्योगिक व व्यापारी कर्ज तसेच इंटरनेट बँकिंग सुविधांची माहिती देत नागरिकांनी बँकेच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.