ताज्या बातम्या
बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. || तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले 'कमळ' ; सरपंचपदी प्राजक्ता वाघ यांची निवड. || २o२५ च्या महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने ज्योती अमोल तुपे सन्मानित. || विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत' अभियान उत्साहात. || इंदापूर पंचायत समिती आरक्षण जाहीर ; कोणता गण कोणासाठी राखीव?. || इंदापूर वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार. || खरी पत्रकारिता लोकशाही बळकट करते : अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार. || पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : प्रविण माने. || निरा-भिमा कारखाना प्रतिटन १०० रुपये देणार ; शेतकऱ्यांची दिवाळी 'गोड' होणार. || करदात्यांना दिलासा ; Tax Audit Report सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. || भगरीच्या पिठामुळे आठ जणांना विषबाधा ; बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील घटना. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला उद्योगभेट ; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम. || बारामतीत चारचाकीची काच फोडून तीन लाखांची रोकड लंपास. || चेक बाऊन्सप्रकरणी चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ; बारामती न्यायालयाचा निकाल. || नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातलं अन शेतातलं सगळं काही हरवून बसलेल्या बळीराजाला आपल्या लेखातून 'तुला जगलंच पाहिजे' म्हणत धीर देताहेत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी. || विद्या प्रतिष्ठानच्या ‘पाटी’ला क्वालालंपूरमध्ये सुवर्णपदक. || सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी सरसावले. || 'जल्लोष २०२५' युवक महोत्सवात विद्या प्रतिष्ठान ठरले सर्वोत्कृष्ट. || ४ ऑक्टोबरपासून ‘सेम डे चेक क्लिअरिंग’ सेवा सुरू ; ग्राहकांना वेगवान व्यवहाराची हमी. || विद्यार्थ्यांच्या कल्पक संशोधनाला वाव ; ‘आविष्कार’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद. || विद्या प्रतिष्ठानच्या मुलींची कबड्डीत विजयी खेळी. || इंदापूर तालुक्यातील गावागावांत 'मोदी विकास मॅरेथॉन' राबवणार : प्रविण माने. || टेक्सटाईल पार्कमधील महिला कामगारांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेवर जनजागृती. || महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ ठरले सर्वोत्कृष्ट. ||

नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !

बारामती नगरपरिषदेच्या स्थगित निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर होताच शहरात पुन्हा एकदा प्रचाराची धग वाढली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन आणि प्रभावी मार्ग अवलंबत आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांनी बारामतीकरांसाठी विकास, सुविधा आणि सामाजिक सुरक्षेचा समतोल साधणारा हटके वचननामा जाहीर केला असून त्याची शहरभर चर्चा सुरू झाली आहे.

● कर सवलतीपासून थेट सेवा घरापर्यंत

या वचननाम्यात घरपट्टी व पाणीपट्टीत ३ टक्के कपात, नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण दालन, तसेच मोबाईल व्हॅनद्वारे नगरपरिषदेच्या सेवा थेट नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ई-रिक्षा प्रवास ही योजना विशेष लक्ष वेधून घेत आहे.

● शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायावर भर

नगरपरिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावून आधुनिक तंत्रज्ञान व उच्चशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २०१८ नंतरच्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी, उद्योगक्षम तरुणांना कर्ज, तसेच प्रत्येक बेरोजगार तरुणाला महिन्याला ६०० रुपये देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

● महिला, ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी विशेष योजना

महिलांच्या बचतगटांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष योजना राबवून महिन्याला ६०० रुपये, तसेच दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत व उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यात आले आहे.

● वाहतूक, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांचा विकास

ट्रॅफिकमुक्त बारामतीसाठी प्रत्येक चौकात सिग्नल व्यवस्था, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही निगराणी, रिक्षाचालक व पथविक्रेत्यांना हक्काची जागा, तसेच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार या वचननाम्यात आहे.

सूर्यनगरी, तांबेनगर, महिला सोसायटी व व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सिटी इन चौक पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

● स्वच्छ, पारदर्शक आणि २४ तास उपलब्ध नगरपरिषद

प्रत्येक पात्र नागरिकाला हक्काचे घर, प्रत्येक घर व सोसायटीमध्ये सोलार प्रकल्प, विकासकामांसाठी जमीन गेलेल्यांना योग्य मोबदला, तसेच भ्रष्टाचारमुक्त, एक फोनवर समस्या सोडवणारी आणि २४ तास नागरिकांच्या सेवेत असणारी आदर्श नगरपरिषद घडवण्याचा संकल्प पठाण मोहसिन अकबर यांनी व्यक्त केला आहे.

या वचननाम्याच्या माध्यमातून त्यांनी किटली या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले असून, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख आश्वासनांमुळे या वचननाम्याची शहरात जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.