बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या उमेदवारांची चर्चा सुरू असताना प्रभाग क्र. १९ मधून नितेश धुमाळ यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे. लोकांमध्ये त्यांच्या नावाबद्दल उत्सुकता असून, जनतेचा प्रतिसादही सकारात्मक दिसून येत आहे. अशातच नितेश धुमाळांची इंन्ट्री 'राजकिय अंदाज चुकवत सत्तेची गणितं बदलवणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत आहे.
प्रभागातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासूनच्या नगरसेवकांच्या कार्यकाळाबद्दल लोक नाराज आहेत. मूलभूत सुविधा जैसे थेच राहिल्या, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता या क्षेत्रांत ठोस कामगिरी दिसली नाही. राहणीमानाचा स्तर उंचावण्यात तत्कालीन लोकप्रतिनिधी अपयशी ठरले, असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे.
त्याचप्रमाणे शैक्षणिक व आरोग्य विषयक सुविधांच्या बाबतीत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठेनगरातील नागरिकांना २५ ते ३० वर्षांपासून 'हक्काच्या घरांचे' दिलेले आश्वासन आजतागायत पूर्ण झालेले नाही. रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबतही तत्कालीन लोकप्रतिनिधींची भूमिका असहकार्याची राहिल्याने युवकांमध्ये नाराजी वाढली आहे.
अशा परिस्थितीत, प्रभागाच्या विकासाचा पर्याय म्हणून नितेश धुमाळ यांचे नाव पुढे आले आहे.
नितेश धुमाळ हे युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या काही वर्षांत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रभागातील तरुणवर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहे.
कोरोना काळात धुमाळ यांनी ‘कोरोना वॉरियर’ म्हणून काम केले होते. त्यांनी त्या काळात नागरिकांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन यांसारख्या आरोग्य सुविधांची उपलब्धता करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्यामुळे अनेक नागरिकांना जीवदान मिळाले होते.
तसेच, शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी प्रभागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले. शालेय साहित्य वितरण, मार्गदर्शन शिबिरे आणि पालकांशी संवाद या माध्यमातून त्यांनी शिक्षणविषयक जागरूकता निर्माण केली आहे.
नितेश धुमाळ यांच्या व्यवहारातील साधेपणा, लोकांशी जोडलेला संवाद आणि सामाजिक कार्यातील सातत्य यामुळे त्यांच्याबाबत जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, “आता आम्हाला बदल हवा आहे. विकासाची नवी दिशा देऊ शकणाऱ्या व्यक्तीची वेळ आली आहे,” असे मत व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १९ मधील निवडणूक रोचक आणि आशादायी ठरण्याची चिन्हे आहेत.
©2026. All Rights Reserved.