बारामती शहरात “लोन क्लोज करून देतो” अशी बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रविंद्र भिमराव डोंबाळे (रा. काटेवाडी) या आरोपीस अखेर बारामती शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
२०२३ साली आरोपीने 'विराज फायनान्स' या नावाने फर्म सुरू करून विविध क्षेत्रातील लोकांना त्यांच्या घेतलेल्या लोनची रक्कम कमी करून देण्याचे आमिष दाखवले. मात्र, नागरिकांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांचा अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती.
सदर आरोपी बराच काळ पोलिसांना चकवा देत होता. मात्र, बारामती शहर पोलिसांच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रविवारी (दि.९) आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्यास अटक करण्यात यश मिळवले आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुर्दशन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, तसेच पोलीस अंमलदार अमीर शेख, अभिजित कांबळे, दत्तात्रय मदने, अक्षय सिताप, गिरीष नेवसे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.
©2026. All Rights Reserved.