ताज्या बातम्या
बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. || तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले 'कमळ' ; सरपंचपदी प्राजक्ता वाघ यांची निवड. || २o२५ च्या महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने ज्योती अमोल तुपे सन्मानित. || विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत' अभियान उत्साहात. || इंदापूर पंचायत समिती आरक्षण जाहीर ; कोणता गण कोणासाठी राखीव?. || इंदापूर वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार. || खरी पत्रकारिता लोकशाही बळकट करते : अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार. || पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : प्रविण माने. || निरा-भिमा कारखाना प्रतिटन १०० रुपये देणार ; शेतकऱ्यांची दिवाळी 'गोड' होणार. || करदात्यांना दिलासा ; Tax Audit Report सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. || भगरीच्या पिठामुळे आठ जणांना विषबाधा ; बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील घटना. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला उद्योगभेट ; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम. || बारामतीत चारचाकीची काच फोडून तीन लाखांची रोकड लंपास. || चेक बाऊन्सप्रकरणी चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ; बारामती न्यायालयाचा निकाल. || नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातलं अन शेतातलं सगळं काही हरवून बसलेल्या बळीराजाला आपल्या लेखातून 'तुला जगलंच पाहिजे' म्हणत धीर देताहेत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी. || विद्या प्रतिष्ठानच्या ‘पाटी’ला क्वालालंपूरमध्ये सुवर्णपदक. || सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी सरसावले. || 'जल्लोष २०२५' युवक महोत्सवात विद्या प्रतिष्ठान ठरले सर्वोत्कृष्ट. || ४ ऑक्टोबरपासून ‘सेम डे चेक क्लिअरिंग’ सेवा सुरू ; ग्राहकांना वेगवान व्यवहाराची हमी. || विद्यार्थ्यांच्या कल्पक संशोधनाला वाव ; ‘आविष्कार’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद. || विद्या प्रतिष्ठानच्या मुलींची कबड्डीत विजयी खेळी. || इंदापूर तालुक्यातील गावागावांत 'मोदी विकास मॅरेथॉन' राबवणार : प्रविण माने. || टेक्सटाईल पार्कमधील महिला कामगारांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेवर जनजागृती. || महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ ठरले सर्वोत्कृष्ट. ||

विद्यार्थ्यांच्या कल्पक संशोधनाला वाव ; ‘आविष्कार’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी (दि.११) महाविद्यालयीन स्तरावरील ‘आविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ११० हून अधिक प्रकल्प सादर केले. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक स्तरावरील विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी, पर्यावरणपूरक व नाविन्यपूर्ण विषयांवर संशोधन मांडले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “संशोधनाचा प्रवास महाविद्यालयीन स्तरापासून सुरू होऊन पीएच.डी. व पोस्ट-डॉक्टरेटपर्यंत व्हावा. समाजातील समस्यांवर उपाय शोधणारे संशोधनच खरी उपयुक्तता सिद्ध करेल.”

स्पर्धेच्या समन्वयक व ARC प्रमुख डॉ. जयश्री बागवडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेची पार्श्वभूमी व उद्दिष्टे उलगडून सांगितली. “ही स्पर्धा विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवोपक्रमासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. आंतरविद्याशाखीय संशोधनास चालना मिळून संशोधक व शास्त्रज्ञांशी संवादाची संधी मिळते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशिद, आयक्यूएसी समन्वयक प्रा. नीलिमा पवार, विभाग प्रमुख व प्राध्यापक, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. रामलिंग ताबे, डॉ. रोहिणी कोळेकर, डॉ. अर्चना कदम, डॉ. नेताजी करळे, डॉ. मंगेश कोळपकर व प्रा. क्रांती वाबळे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व परीक्षक, मार्गदर्शक प्राध्यापक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.