मागील तीन महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेली तक्रारवाडी ग्रामपंचायत अखेर ठरली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता सचिन वाघ यांची निवड झाली असून, ग्रामपंचायतीत 'कमळ' फुलल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागल्याने, तक्रारवाडीतील हा निकाल आगामी नगरपरिषद निवडणुकीतही 'माने फॅक्टर' प्रभावी ठरणार, अशी चर्चा सध्या शहरभर सुरू आहे.
यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले की, "प्राजक्ता वाघ यांची निवड ही योग्य आणि सार्थ आहे. तक्रारवाडीतील प्रलंबित विकासकामांना आता गती मिळेल. शासन दरबारी आवश्यक पाठपुरावा करून सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
या कार्यक्रमास विजयकुमार गायकवाड, श्रीकांत काशिद, सूरज वाघ, सागर जगदाळे उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.