इंदापूर विधानसभेच्या मैदानात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केलेले पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती व सदस्य प्रविण माने हे आज सोमवारी (दि.२८) भिगवण - शेटफळगढे जिल्हा परिषदेच्या गटाच्या दौऱ्यावर आहेत. या गाव भेट दौऱ्यात वैयक्तिक गाठी भेटींसह घोंगडी बैठकांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
या दरम्यान प्रविण माने हे डाळज नं. ३ (स.९ वा), डाळज नं. १ (स.१० वा), डाळज नं. २ (स.११ वा), कुंभारगाव (दु.१२ वा), बंडगरवाडी (दु. १ वा), पोंधवडी (दु.३ वा), अकोले (दु.४ वा), निरगुडे (सायं.५ वा), लाकडी (सायं.६ वा) व निंबोडी (सायं.७ वा) या गावांना भेटी देणार आहेत.
प्रविण माने यांचा आजचा गाव भेट दौरा हा उजनीच्या पाणलोट क्षेत्रात व लाकडी - निंबोडी सारख्या दीर्घकाळ पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या गावांत होत आहे. आणि विधानसभेच्या तोंडावर माने या भागातील शेतकरी व नागरिकांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यावरील उपाययोजनांच्या संदर्भात काय भूमिका मांडताहेत हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
©2026. All Rights Reserved.