राज्यात अनेक मतदारसंघात मविआच्या दोन घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवकाश आहे. त्यानंतरचे काळातः व्यवस्थित झालेले दिसेल शिवाय राष्ट्रवादीचे उर्वरित जागा वाटप पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आजच जाहीर करतील अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, बारामतीत युगेंद्र यांच्या रुपाने मविआने तरुण उमेदवार दिला आहे. परदेशात त्यांचे शिक्षण झाले असून उच्च पदवीधर आहे. प्रशासन, व्यवसायातील त्यांना माहिती आहे. विशेषतः साखर धंदा, ऊसाचे जाणकार आहेत. बारामतीची जनता या नेतृत्वाचा स्विकार करेल असे पवार म्हणाले.

युगेंद्र यांना काय कानमंत्र द्याल या प्रश्नावर ते म्हणाले, मी स्वतः गेल्या ५७ वर्षांपूर्वी बारामती तहसील कार्यालयात स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होतो. त्या दिवसापासून जनतेने मला सातत्याने निवडून दिले. ५७ वर्षे मी लोक प्रतिनिधी आहे. एकच सल्ला देईल की त्यांनी जनतेशी बांधिलकी ठेवावी. विनम्रता ठेवावी. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने संधी दिल्यानंतर ती विनम्रतेने स्विकारून त्यासाठी सातत्याने जागरुक रहावे.
राज्यात मविआने काही ठिकाणी दोन अर्ज दाखल केले आहेत. घटक पक्षांचेही अर्ज आहेत. परंतु यामध्ये आम्ही एकत्रित मार्ग काढू. अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवधी आहे. बहुसंख्य जागांवर एकमत झाले आहे. काही जागांबाबत अडचणी आहेत, तेथेही निश्चित मार्ग निघेल. मविआत कोण किती जागा लढवेल हे मला माहित नाही. आमचे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष ते काम पाहतात. उरलेली यादी ते जाहीर करतील. असे पवार म्हणाले
बारामतीकर मविआच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील
बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती काही मर्यादित लोकांनाच असेल. बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. १९६५ पासून मी आजवर इतक्यांदा उभा राहिलो. सुरुवातीला काही निवडणूकांना मी इथे प्रचाराला येत होतो. नंतर तर ती जबाबदारी बारामतीकरांनीच घेतली. या निवडणूकीतही ते मविआच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असे शरद पवार म्हणाले.
बारामतीचा शाश्वत विकास करणार : यूगेंद्र पवार
५८ वर्षांपूर्वी बारामतीकरांनी पवारसाहेबांना ज्या प्रकारे साथ दिली तशीच साथ त्यांनी मलाही द्यावी. जनतेच्या अडचणी, प्रश्न समजवून घेऊन जनतेत राहून ते प्रश्न सोडवणार. बारामतीच्या शाश्वत विकासासाठी अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत यूगेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
©2026. All Rights Reserved.