ताज्या बातम्या
बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. || तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले 'कमळ' ; सरपंचपदी प्राजक्ता वाघ यांची निवड. || २o२५ च्या महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने ज्योती अमोल तुपे सन्मानित. || विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत' अभियान उत्साहात. || इंदापूर पंचायत समिती आरक्षण जाहीर ; कोणता गण कोणासाठी राखीव?. || इंदापूर वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार. || खरी पत्रकारिता लोकशाही बळकट करते : अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार. || पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : प्रविण माने. || निरा-भिमा कारखाना प्रतिटन १०० रुपये देणार ; शेतकऱ्यांची दिवाळी 'गोड' होणार. || करदात्यांना दिलासा ; Tax Audit Report सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. || भगरीच्या पिठामुळे आठ जणांना विषबाधा ; बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील घटना. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला उद्योगभेट ; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम. || बारामतीत चारचाकीची काच फोडून तीन लाखांची रोकड लंपास. || चेक बाऊन्सप्रकरणी चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ; बारामती न्यायालयाचा निकाल. || नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातलं अन शेतातलं सगळं काही हरवून बसलेल्या बळीराजाला आपल्या लेखातून 'तुला जगलंच पाहिजे' म्हणत धीर देताहेत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी. || विद्या प्रतिष्ठानच्या ‘पाटी’ला क्वालालंपूरमध्ये सुवर्णपदक. || सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी सरसावले. || 'जल्लोष २०२५' युवक महोत्सवात विद्या प्रतिष्ठान ठरले सर्वोत्कृष्ट. || ४ ऑक्टोबरपासून ‘सेम डे चेक क्लिअरिंग’ सेवा सुरू ; ग्राहकांना वेगवान व्यवहाराची हमी. || विद्यार्थ्यांच्या कल्पक संशोधनाला वाव ; ‘आविष्कार’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद. || विद्या प्रतिष्ठानच्या मुलींची कबड्डीत विजयी खेळी. || इंदापूर तालुक्यातील गावागावांत 'मोदी विकास मॅरेथॉन' राबवणार : प्रविण माने. || टेक्सटाईल पार्कमधील महिला कामगारांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेवर जनजागृती. || महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ ठरले सर्वोत्कृष्ट. ||

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार : खा.सुप्रिया सुळे

हर्षवर्धन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; इंदापूरची तुतारी मंत्रालयात जाणार

महाराष्ट्र हा सध्याच्या भ्रष्टाचारी सरकारपासून मुक्त करावयाचा आहे. तसेच दूध, कांदा, सोयाबीन आदी पिकांना चांगला भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात एक क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे. निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे गुरुवारी (दि.२४) केले.





माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार म्हणून गुरुपुष्पामृतच्या मुहूर्तावर भव्य रॅली काढून  गुरुवारी (दि.२४) अर्ज दाखल केला. यावेळी खा.सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करणेपूर्वी भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांचे खा. सुप्रिया सुळे, भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे यांनी औक्षण केले.


उमेदवारी अर्ज दाखल झालेनंतर आयोजित  महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात खा.सुप्रिया सुळे बोलत होत्या. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचीच मेळाव्यानंतर चर्चा सुरू होती.


सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यपातळीवर काम करणारी नेते आहेत, त्यांना आता राज्यभर काम करावे लागणार आहे. निवडणुकीनंतर विजयाचे सर्टिफिकेट घेऊनच आपण मुंबईला जाऊ या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.


काही लोकं तिकिटासाठी दिल्लीला गेले. आपण सगळं महाराष्ट्र मध्ये ठरतं, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीतील घटक पक्षांना लगावला. ज्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट दिले जाते ते पैसे घेतात त्यामुळे कामाची गुणवत्ता राहत नाही, आपणास खड्डे मुक्त रस्ते तयार करायचे आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.




हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचे एवढे ज्येष्ठ नेते कोणीच नाही. 84 वर्षाचे संघर्ष योद्धा शरद पवार यांना अडचणीच्या काळात साथ देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. मात्र इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी अडचणीच्या काळात शरद पवार साहेबांना धोका दिला आहे. त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा मतदारांनी  दाखवून द्यावी.


विद्यमान लोकप्रतिनिधींनी २००९ मध्ये आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती, त्यावेळी त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच दोन वर्षांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. शरद पवार यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने आता इंदापूर तालुक्यात विधानसभेला बदल घडणारच, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.


ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर तालुक्यात सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला. त्याच सर्वधर्मसमभावाच्या विचारानुसार आम्ही कार्यकर्ते वाटचाल करीत आहोत. आगामी ५ वर्षात इंदापूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, तालुक्याचा सर्व क्षेत्रातील विकास करावयाचा आहे. तालुक्यातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही प्राधान्याने सोडविला जाणार आहे, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात दिली.


यावेळी पृथ्वीराज जाचक, मुरलीधर निंबाळकर, राहुल मखरे, तेजसिंह पाटील, अँड कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, भारतीताई शेवाळे, अशोक घोगरे, सागरबाबा मिसाळ, नितीन शिंदे, काका देवकर, प्रा.कृष्णाजी ताटे, अनिल पवार, संजय शिंदे, बाबासाहेब भोंग, तुषार खराडे यांनी मनोगत व्यक्त केले.


या सभेमध्ये इंदापूर शहरातील अनिलअण्णा पवार (मेम्बर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच बावडा ग्रा.पं. सदस्य पांडुरंग कांबळे, सुनील साबळे, विनोदकुमार जाधव यांनी असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार खा.सुप्रिया सुळे व हर्षवर्धन पाटील यांनी केला.


यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अंकिता पाटील ठाकरे, महारुद्र पाटील, राजवर्धन पाटील, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, कार्याध्यक्षा आश्मा मुलाणी, मयूरसिंह पाटील, अमोल भिसे, सुखदेव घोलप, आशुतोष भोसले, उदयसिंह पाटील, हेमंत नरुटे, उमेश घोगरे, चांगदेव घोगरे, शहराध्यक्ष इनायत काझी, महिलाध्यक्षा रेश्मा शेख, बाळासाहेब पाटील, नंदकुमार सोनवणे, प्रदीप पाटील, मोहन दुधाळ, पांडुरंग शिंदे, शिवाजी हांगे, बापू कोकाटे आदींसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसचे व विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कैलास कदम व राजेंद्र पवार यांनी तर आभार ॲड. शरद जामदार यांनी मानले.

इंदापूरची तुतारी मंत्रालयात जाणार : खा. सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी इंदापूरची तुतारी विधानसभेत पोहोचणार असल्याची ग्वाही इंदापूर येथे दिली होंती. त्याचा संदर्भ घेऊन सुप्रिया सुळे यांनी तुतारी विधिमंडळ बरोबर मंत्रालयातील पोचणार असल्याचे नमूद करताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पवार साहेबांनी राज्याचा विचार करून उमेदवारीचा निर्णय घेतला - हर्षवर्धन पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातून ६ जणांनी उमेदवारी मागितली होती. लोकशाहीमध्ये उमेदवारीची इच्छा व्यक्त करणे योग्यच आहे. मीही पक्षाकडे उमेदवार मागणीचा अर्ज केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचा  सारासार विचार करून माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतला. माझे पक्षातील या सहकाऱ्यांना आवाहन आहे की, पवार साहेबांचा विचार सोडू नका, त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. उमेदवारी मागणारे सर्वजण आम्ही एकमेकांच्या जवळचे सहकारी आहोत. त्यामुळे यातून निश्चित  मार्ग निघेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले.


दिवस द्या, वर्षे माझी जबाबदारी : हर्षवर्धन पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान होईपर्यंत २५ दिवस पक्षासाठी द्या, नंतरची ५ वर्षे माझी जबाबदारी राहील, असे आवाहन भाषणात केले.



हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.