ताज्या बातम्या
डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. ||

'अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष'

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन

● इंदापूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचा दावा करत, 'अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष' अशा घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी प्रशासकीय भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांच्याकडे निवेदन सादर केले.

पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, अशोक घोगरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तेजसिंह पाटील या वेळी बोलताना ॲड. तेजसिंह पाटील म्हणाले की, भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. त्याचा राग, द्वेष ठेवून केंद्रातील भाजपप्रणित सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली. महाराष्ट्राच्या तुलनेने महसूल कमी असताना केवळ चंद्राबाबू नायडू व नितीशकुमार यांच्या पाठिंब्यावर केंद्रशासन तरल्याने, आंध्र प्रदेश व बिहारसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.

अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, बेरोजगार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त यांच्यासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. हा अर्थसंकल्प देशवासियांची निराशा करणारा आहे, असे ही ते म्हणाले.

आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, केंद्र सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, सर्वसामान्य लोक, तरुणांसाठी कोणती ही भरीव तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने हे आंदोलन केले आहे.

यावेळी शकीलभाई सय्यद, कांतीलाल झगडे, शहराध्यक्ष  ॲड. इनायतअली काझी, पोपटराव पवार, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, गणेश महाजन, श्रीनिवास शेळके, अमोल मुळे, श्रीकांत मखरे, विकास खिलारे, सिकंदर बागवान, अनिल ढावरे, अजय पारसे, अक्षय सुर्यवंशी, भारत यादव, नारायण वीर, दीपक गुरगुडे, युवराज सरक, छाया पडसळकर, रेश्मा शेख, विजया कोकाटे, तमन्ना शेख, सुनीता नरुटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.