ताज्या बातम्या
डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. ||

लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी संदिप जाधव

मुंबई : प्रतिनिधी (दि. १३ जुलै २०२४)
             पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी पत्रकार संदिप जाधव यांची निवड झाली आहे. लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य यांच्या हस्ते त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्यभरात लोकशाही पत्रकार संघामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. पत्रकारांना विमा कवच, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण, घर, नवे तंत्रज्ञान कौशल्य, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन या प्रश्नांकडे लोकशाही पत्रकार संघाने लक्ष केंद्रित केले असल्याने राज्यभरातील पत्रकारांचा देखील मोठा प्रतिसाद लोकशाही पत्रकार संघाला मिळत आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असूनही तो अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, त्याच्या संरक्षणाचा प्रश्न मागे पडला आहे, तो लोकशाहीचा महत्वाचा घटक असूनही निराधार असल्याचे परखड मत निवडीनंतर पत्रकार संदिप जाधव यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच डिजिटल मीडिया’ला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात घेतले जात नाही. ‘डिजिटल मीडिया’चे काम करणाऱ्या पत्रकारांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत.

‘डिजिटल मीडिया’तल्या सर्व पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे यासाठी भविष्यात आमची लढाई असेल. असे जाधव यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन क्षेत्रात काम करत असलेल्या पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्यात काम करणार असल्याचे सांगत जाधव यांनी या राज्यपातळीवरील महत्त्वाच्या पदावर निवड करत काम करण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष भागवत वैद्य व लोकशाही पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. एकंदरीत या निवडीनंतर पत्रकार संदिप जाधव यांच्यावर विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.